वेंगुर्ला प्रतिनिधी- कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला प्रारंभ झाला असून पहाटेच्यावेळी होणा-या या आरतीने वातावरण भक्तिमय होत आहे.
वेंगुर्ला: कोजागिरी पौर्णिमेपासून जिल्ह्यात काकड आरतीला प्रारंभ झाला असून पहाटेच्यावेळी होणा-या या आरतीने वातावरण भक्तिमय होत आहे. आश्विन पौर्णिमेपासून जिल्ह्यातील काही ग्रामदेवतेच्या मंदिरात तसेच ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात काकड आरतीला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार ही काकड आरती केली जात आहे. वेंगुर्ला येथे भुजनागवाडी, माणिकचौक व दाभोसवाडा या विठ्ठल मंदिरांमध्ये काकड आरती सुरु आहे. पहाटेला ५.३०ला सुरु होणारी ही आरती ६.३०ला संपत आहे. यामध्ये भुपाळी, काकडा, भजन, आरती, देवतांना मंगलस्नान असे कार्यक्रम होत आहे. भाविकांचाही या काकड आरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसाची सुरुवात पहाटेच देवाच्या नामस्मरणाने होत असल्याने परिसरातील वातावरणही सुखद झाले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtraमहाराष्ट्र-लोकसेवा-आयो/
फोटोओळी – वेंगुर्ला-भुजनागवाडी येथील विठ्ठल मंदिरात काकड आरतीला उपस्थित भाविक भक्त.


